Dhananjay Munde addressing media after responding to Manoj Jarange’s allegations. Saam Tv
Video

जरांगेंना मी नकोय, मला संपवण्याचा कट रचला जातोय, धनंजय मुंडेंचा पलटवार|VIDEO

Manoj Jarange vs Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे माझ्या जीवावर उठले आहेत, असं सांगत मुंडेंनी त्यांच्यावर राजकीय आणि सामाजिक कटाचा आरोप केला आहे.

Omkar Sonawane

अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे ह्या पृथ्वीतलावरच नसावा, यासाठीही धडपड आहे,' अशा शब्दात मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यात फायदा आहे की ईडब्ल्यूएसमधून, यावर त्यांनी जरांगे यांना महाराष्ट्राच्या जनतेसमोर येण्याचे आव्हान दिले. यावेळी बोलताना, कोपर्डी बलात्काराच्या वेळी आपण पीडितेच्या बाजूने उभे राहिल्याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच, आपण पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात ८० हजार कुणबी प्रमाणपत्रे वाटल्याचा दावाही त्यांनी केला. जरांगे यांच्यासोबत आपले वैयक्तिक वैर नसूनही, केवळ राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या संपवण्यासाठीच हे सर्व सुरू असल्याचा आरोप मुंडेंनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT