Mumbai Pune Missing Link update  Saam Tv
Video

मुंबई-पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडून पहिला प्रवास, VIDEO

Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण करण्यात आलंय. या मिसिंग लिंकचा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी पहिला प्रवास केला आहे.

Vishal Gangurde

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ आणखी वाचणार आहे. या मार्गावरील मिसिंग लिंकचं आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या मिसिंग लिंकमुळे हजारो प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

मार्गाचे लोकार्पण झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: कार चालवत संपूर्ण मिसिंग लिंकचा प्रवास केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते. मिसिंग लिंकमुळे प्रवाशांचा तब्बल अर्धा ते एक तासाचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवास सुसाट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT