Devendra Fadnavis addressing the media after the Malegaon verdict, calls it a political conspiracy by the UPA government. Saam Tv
Video

Devendra Fadnavis: मालेगाव निकालावर देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले... VIDEO

Malegaon Blast Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात सर्व आरोपी निर्दोष ठरल्यावर देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं षड्यंत्र यूपीए सरकारने केलं, अशी घणाघात करत त्यांनी काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली.

Omkar Sonawane

मालेगाव बॉम्बब्लास्टप्रकरणी आज NIA च्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. कुठलाही ठोस पुरावा मिळाला नाही यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, कॉँग्रेसने हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला, आता त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी. कॉँग्रेसप्राणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा नेरेटीव सेट करण्याचा प्रयत्न केला होता. हिंदू व भगवा आतंकवाद आहे, हा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. तो किती खोटा आहे हे आज सिद्ध झाले. कोर्टाने पुराव्यानिशी आज सांगितले आहे. ज्याच्यावर कारवाई केली त्यांची कॉँग्रेसने माफी मागावी. संपूर्ण हिंदू समाजाची कॉँग्रेसने माफी मगावी. असे फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, मी पोलिसांना दोष देणार नाही. यूपीए सरकारने हे षडयंत्र तयार केले होते. पोलिसांवर त्यांचा दबाव होता. 9/11 हल्ल्यानंतर जगभरात हा दहशतवाद तयार झाला होता. इस्लामिक दहशतवाद तयार झाला होता. त्याला विरोध म्हणून हिंदू आणि भगवा दहशतवाद असा प्रकार यूपीए सरकारने निर्माण केला होता असे देवेंद्र फडणवीस म्हणाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Weight Loss Tips: हिवाळ्यात वजन भरभर कमी होईल, घरीच करा हे सोपे उपाय

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा धक्का, घोटाळा प्रकरणात सख्ख्या पुतण्याला अटक

PM Yashasvi Yojana: या सरकारी योजनेत विद्यार्थ्यांना मिळते १.२५ लाखांची स्कॉलरशिप; अर्ज कसा करावा?

Fatty liver warning: लिव्हर खराब झाल्याचे संकेत चेहऱ्यावर दिसतात; हे ३ बदल दिसल्यास लगेच डॉक्टरकडे धावा

Uddhav Thackeray: विरोधी पक्षनेतेपद नाही तर उपमुख्यमंत्रीपद कशाला? उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT