Sharad Pawar NCP stand on Delimitation Bill 2026 saam tv
Video

Delimitation Bill Row: शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसणारा, त्यांना सत्तेशिवाय... - विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar statement on Sharad Pawar : डिलिमिटेशन विधेयकावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला विचारधारा नसल्याचे विधान करताच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पलटवार केला.

Namdeo Kumbhar

डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली.

शरद पवार जातीवादी आणि धर्मांध शक्तींशी हातमिळवणी करतील असे कधीच वाटले नव्हते, पण पवारांचा इतिहासच खंजीर खुपसण्याचा आहे, हे संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला माहीत असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापनाच केवळ सत्तेसाठी झाली असून, या पक्षाला कोणतीही विचारधारा नाही आणि सत्तेशिवाय 'पाण्याविना माशासारखी' यांची अवस्था होते, असे ते म्हणाले. तसेच, पवारांच्या वयाच्या ८५ व्या वर्षीही महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन पाठिंबा देत त्यांना राज्यसभेवर निवडून पाठवले होते, असेही वडेट्टीवार म्हणाले.

राष्ट्रवादीचा हल्लाबोल

आमचं दैवत असलेल्या शरद पवारांवर कोणी टीका केली तर आम्ही खपवून घेणार नाही. विजय वडेट्टीवार यांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये. आमच्या पक्षाचे निर्णय घेण्याचा आमचा अधिकार आहे. काँग्रेस पक्ष निर्णय घेत असताना आम्हाला विचारात घेत नाही. काँग्रेस नक्की कशासाठी डिलिमिटेशनला विरोध करताहेत, ते त्यांनी सांगावं. एकदा त्यांनी खुलासा करावा, असा सवाल प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काँग्रेसला केला आहे. सोमवारी विधेयक सभागृहात केव्हा मांडलं जातंय, ते पाहूनच आम्ही निर्णय घेणार असल्याचंही शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राहुल गांधी संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेणार

Winter Hacks : कडाक्याच्या थंडीतही स्वेटरशिवाय शरीर राहील उबदार, थंडीला पळवून लावतील 'या' ५ भन्नाट ट्रिक्स

मोदींचा विरोधकांवर थेट हल्ला! ३० तारखेला संसदेत नेमकं काय घडणार? महिला आरक्षणावरून दिल्लीत मोठा भूकंप!

तरुणींना आवडतील अशा ५ मॉडर्न साड्या, सौंदर्य पाहतच राहाल

Health Tips : ऑलिव्ह ऑईल रोज खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

SCROLL FOR NEXT