Maharashtra Political News  AI Image
Video

Delimitation Bill : डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यास शरद पवारांची राष्ट्रवादी गद्दार , संजय राऊतांचा इशारा

Delimitation Bill Sanjay Raut News : मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले. सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला गद्दार ठरण्याचा इशारा दिला.

Alisha Khedekar

केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच Delimitation आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली असून, यानुसार सर्व राज्यांतील लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढणार आहेत. ही व्यवस्था २०५१ पर्यंत लागू होणार आहे. या विधेयकासाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान आकड्यांची जुळवाजुळव सुरू असतानाच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका दर्शवली आहे. यावरून संजय राऊत यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास ती राष्ट्रवादी गद्दार ठरेल असा इशारा दिला आहे.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, "आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत. नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते. तसेच डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे. जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत असून ते २१व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील" असं त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भुसावळात भैरू वाईन अँड बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई!

अमिताभ बच्चन यांना पाचव्यांदा घरावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी; दिलजीतच्या शोवरून ३० दिवस ग्रेनेड हल्ल्यांचा इशारा!

28 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; गुन्हेगारांवर वचक बसणार? कोणाची कोणत्या जिल्ह्यात नियुक्ती?

Bike Maintenance: बाइक रोज चालवणं चांगलं की आठवड्यातून काही दिवस बंद ठेवणं?

डिलिमिटेशन विधेयकाला केंद्राची मंजुरी; लोकसभेच्या किती जागा वाढणार, कुणाचा पाठिंबा, कुणाचा विरोध, पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT