Protesters gather at Jantar Mantar in Delhi amid rising tensions, alleging police lathi charge during the demonstration. saam tv
Video

पाठीवर व्रण, खूप मारलं! दिल्लीत आंदोलन तापलं; भयावह स्थिती सांगणारा व्हिडीओ

Abhijit Dipke fast ends Delhi protest update: दिल्लीत जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप. आंदोलकांचा “खूप मारलं” असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल; संसदेकडे मोर्चा निघाल्याने तणाव वाढला.

Omkar Sonawane

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले आहे. जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप केला असून या घटनेनंतर परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. आंदोलकांकडून पाठीवर व्रण, खूप मारलं असा दावा करणारा व्हिडिओही समोर आला आहे. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्यानंतर दिपके यांनी उपोषण सुरू केले होते.

सध्या अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा संसदेच्या दिशेने निघाला आहे. या मोर्चातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच आंदोलक संसदेच्या दिशेने निघाले. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, लाठीचार्जनंतरही आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

कितीही मारलं तरी आंदोलन थांबणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला असून, दिल्लीमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT