Lucky Bagde, the 30-year-old from Gondia, moments before being bitten by a cobra during a dangerous snake stunt that proved fatal. Saam Tv
Video

धक्कादायक! सापासोबत स्टंटबाजी करनं महागात पडलं; ३० वर्षीय तरुणाचा कोब्राच्या दंशाने मृत्यू|VIDEO

Cobra Bite During Snake: गोंदिया जिल्ह्यातील घोगरा येथे लक्की बागडे या ३० वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. प्रशिक्षित नसतानाही साप पकडण्याचा प्रयत्न करताना त्याला नागाने चावले.

Omkar Sonawane

सापासोबत स्टंटबाजी करनं एका 30 वर्षीय तरुणाला चांगलाच महागात पडला. यात त्याला आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील घोगरा येथे ही घटना घडली आहे. लक्की बागडे (30) असे मृतक तरुणाचे नाव आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील घोगरा या गावात कुंभरे यांच्या घरी साप निघाल्याची माहिती मिळताच लक्की बागडे साप पकडायला गेला. मात्र, साप पकडण्याचे कुठलेही प्रशिक्षण नसताना देखील लक्की बागडे या तरुणाने स्टंटबाजी साठी तो साप पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र कोब्रा सापाने त्याच्या हाताला दंश मारला.

या घटनेचा व्हिडिओ देखील काढण्यात आला. दरम्यान, साप चावल्याने त्याला तातडीने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील उपजिल्हा रुग्णांमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT