Nandurbar dead fly found in anganwadi food saam tv
Video

Shocking News : अंगणवाडीत पोषण आहारात आढळली मेलेली माशी, VIDEO

Nandurbar Breaking News : नंदूरबारमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंगणवाडीतील पोषण आहारात मेलेल्या माश्या आढळून आल्या. निकृष्ट पोषण आहार दिला जात असून, मुलांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

Nandkumar Joshi

सागर निकवाडे, नंदूरबार | साम टीव्ही

अंगणवाडीतील मुलांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार नंदूरबारमध्ये उघडकीस आला आहे. मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मेलेली माशी आढळून आली. त्यामुळं जिल्ह्यातील अंगणवाडीत येणाऱ्या आदिवासी बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नंदूरबारमधील प्रकाशा गावातील अंगणवाडी क्रमांक ५ भवानी हट्टीमधील डाळ आणि भातामध्ये मेलेली माशी आढळली. पोषण आहारात जवळपास एक इंच लांब असलेली मेलेली माशी आढळली. बालकांना आणि गरोदर महिलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी महिला बालकल्याण विभागाकडून पोषण आहार दिला जातो. पण निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो, असा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी पालक शंकर भिल यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. तर ग्रामविकास अधिकाऱ्याने संबंधित अंगणवाडीतील अंगणवाडी सेविकेकडून खुलासा मागवला आहे. यासंदर्भात प्रकाश गावचे ग्रामविकास अधिकारी बी जी पाटील यांना विचारणा केली असता संबंधित अंगणवाडी सेविकेला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT