Indrayani River Pollution fish found dead saam tv
Video

Indrayani River: इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, कारण धक्कादायक, VIDEO

Indrayani River Pollution : आळंदीतील इंद्रायणी नदीमध्ये मृत माशांचा खच झाला आहे. यामुळं ग्रामस्थ संतापले आहेत. माणसं मरायची वाट पाहणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला.

Nandkumar Joshi

गोपाळ मोटघरे, आळंदी

वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणाऱ्या देवाच्या आळंदीतील इंद्रायणी नदी किती प्रदूषित झालीये ही सांगणारी दृश्ये आता समोर आली आहेत. ही नदी इतकी जीवघेणी झालीये की या पाण्यात मृत माशांचा खच पाहायला मिळतोय.

आता या दूषित पाण्यानं माणसं मरायची वाट पाहणार का? असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून विचारला जातोय. नदीत रसायनयुक्त पाणी सोडण्याचं पाप अनेक कंपन्या करताहेत. त्यामुळं ही नदी अनेकदा फेसाळते, जीवघेणी होते. वारकऱ्यांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणीनं मोकळा श्वास घ्यावा म्हणून अनेकदा आंदोलनं केली. हे पाहून मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी अनेक आश्वासनेही दिली. मात्र प्रभावी अंमलबजावणी कधीच झाली नाही, परिणामी आज मृत माशांचा खच पाहायला मिळतोय. त्यामुळं आळंदीकर पुन्हा आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोपदेव घाट आजपासून सात दिवस बंद

Success Story: अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या लेकींनी क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; ५ बहिणी झाल्या सरकारी अधिकारी

८ जानेवारीचा दिवस कसा असेल? पंचांगानुसार चार राशींना मिळणार लाभ, धनलाभही होणार

दादांना घेरण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? भाजपच्या 'मिशन 100' ला 'दादां'चे आव्हान

Ambarnath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला भगदाड, काँग्रेसच्या त्या १२ नगरसेवकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT