Kabutar Khana SAAM TV
Video

Dadar : हायकोर्टाच्या आदेशानुसार दादर कबुतरखाना बंद; परिसरातील कबुतरांची संख्या घटली | VIDEO

Kabutar Khana : मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेनं कारवाई केल्यामुळे दादरचा वादग्रस्त कबुतरखाना पूर्णपणे बंद झालाय. या परिसरातील कबुतरांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितल आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील दादर परिसरातील वादग्रस्त कबुतरखाना अखेर बंद करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेने कारवाई करत हा कबुतरखाना पूर्णपणे बंद केला. गेल्या महिन्यात हायकोर्टाने कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घालत पर्यावरण आणि मानवी आरोग्याशी निगडित धोक्यांचा गंभीर उल्लेख केला होता. कबुतरखान्यांमुळे होणाऱ्या आजार आणि प्रदूषणाच्या समस्येमुळेच न्यायालयाने हा निर्णय घेतला होता. सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाच्या आदेशाला दुजोरा दिल्यानंतर पक्षी मित्र संस्थांना माघार घ्यावी लागली. स्थानिक नागरिकांच्या मते, कबुतरखाना बंद झाल्यापासून परिसरातील कबुतरांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा आज इतक्या रूपयांना मिळणार, वाचा मुंबई-पुण्यातील ताजा भाव

Maharashtra News Live Update: मध्यरात्रीच्या पावसानंतर साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा - लवारी मार्गावरील पुलावर पाणी

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Mumbai Crime : मुंबईत खळबळ! रिपाई आठवले गटाच्या १५ पदाधिकाऱ्यावर गुन्हा, 'या' ठिकाणी प्लॉट हडपण्याचा प्रयत्न

महागड्या शॅम्पूची गरज नाही, लांब आणि घनदाट केसांसाठी सकाळी प्या हेल्दी ड्रिंक्स

SCROLL FOR NEXT