Dharashiv News SaamTV
Video

Dharashiv News : पावसाने उडवली दाणादाण; VIDEO

Saam Tv

मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता काढणीला आलेल्या पिकांवर याचा परिणाम दिसून येत आहे. पीकं पाण्याखाली गेलेली आहेत. तर काही ठिकाणी पिकांवर रोग पडला आहे.

धारशिव जिल्ह्यात देखील अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान झालेलं बघायला मिळत आहे. शेतात पाणी सचल्याने सोयाबीन पीक अक्षरश: चिखलात आडवे झाले आहेत. जवळपास 2 लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा 1200 कोटींचा फटका बसणार आहे. दरम्यान, असाच पाऊस सुरू राहील तर या नुकसणीत वाढ होण्याची भिती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. धारशिवच्या 16 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ठेवला होता. त्यानंतर पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने सर्व पीक वाया गेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu: दोन महिन्यानंतर हे भाऊ सावत्र होतील; लाडकी बहिणी योजेनेवरून बच्चू कडू यांची कोपरखळी

Pimples Problem: चेहऱ्यावर 'हा' पदार्थ वापल्यास पिंपल्सच्या समस्या होतील दूर....

'Stree 2' Aaj Ki Raat Song: 'स्त्री 2'मध्ये 'आज की रात' गाण्याची निवड का केली? दिग्दर्शकाने केला खुलासा

Marathi News Live Updates: पुणे, रायगड, रत्नागिरीमध्ये रेड अर्लट; पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

Pune school Bus Accident : पुण्यात विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस आणि डंपरचा अपघात; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT