पालघर डहाणू विधानसभेवर पुन्हा एकदा लाल झेंडा फडकला असून भाजपच्या विनोद मेढा यांचा 5 हजार पेक्षा अधिक मताधिक्याने पराभव करत सीपीएमचे विनोद निकोले दुसऱ्यांदा आमदार म्हणून विराजमान झालेत. 2014 चा अपवाद वगळता सीपीएमला आपला गड कायम राखण्यात यश आलं आहे. दुसऱ्यांदा जनतेने माझ्या बाजूने कौल दिलाय मी जनतेतला आमदार असून जनतेच्या सेवेत कायम तत्पर राहील, असा विश्वास विनोद निकोले यांनी साम सोबत केलेल्या बातचीतच्या वेळी व्यक्त केलाय.
पुढे बोलताना निकोले म्हणाले की, मी सतत मतदारसंघातल्या जनतेसोबत राहातो. पूर्ण विकासकामं मी केलेली नसली तरी मला शक्य आहेत तेवढी कामं मी करतो. त्यामुळे गेल्या पाच वर्षात मी इथल्या लोकांना त्यांच्यातलाच वाटतो. माझ्या विरोधकांनी कितीही पैसा वाटला तरी पुन्हा मीच निवडून येईल यावर माझा विश्वास होता, असंही यावेळी बोलताना त्यांनी म्हंटलं. येणाऱ्या काळात पालघर डहाणूमधून होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करणार असल्याचं देखील यावेळी विनोद निकोले यांनी सांगितलं.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.