Devendra Fadanvis News : राज्याच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो, देवेंद्र फडणवीसांचं जनतेसाठी खास पत्र

Devendra Fadanvis Write A Letter : विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. राज्यातील जनतेचा एकतर्फी कौल महायुतीच्या बाजूने गेला आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेसाठी पत्र लिहिलं आहे.
Devendra Fadanvis News Update
Devendra Fadanvis News UpdateSaamTv
Published On

विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाल्यानंतर आता राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महायुतील राज्याच्या जनतेने एकतर्फी कौल दिला आहे. त्यानंतर आता महायुतीचं सरकार लवकरच सतहपण होणार आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेपुढे नतमस्तक होतो, असं या पत्रात फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

राज्यात गेल्या एक ते दीड महिन्यापासून विधानसभा निवडणुकीचं धुमशान सुरू होतं. प्रचाराच्या रणधुमाळीनंतर 20 नोव्हेंबरला राज्यात एका टप्प्यात मतदान पार पडलं. तर काल 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला आहे. यात 230 जागांवर विजय मिळवत महायुतीच्या सरकारला पूर्ण बहुमत मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला दिसला. या निकालानंतर आता राज्यात सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने वेगवान घडामोडी घडतांना दिसत आहेत. यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला उद्देशून करणारं एक पत्र लिहिलं आहे. या पत्राचा अक्षय महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानणारा आहे.

Devendra Fadanvis News Update
Sharad Pawar : 'आम्ही सत्तेत नसलो तर...'; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया

मी जनतेपुढे नतमस्तक होतो. लाडक्या बहीणीच्या आशीर्वादाने हा विजय प्राप्त झाला आहे. सकरण्यात यश आलं. यासाठी लाडक्या बहीणींचे आभार व्यक्त करतो. राज्याच्या जनतेचा आमच्यावर असलेला विश्वास हा विजयाचा शिल्पकार ठरल्याचं या पत्रातून म्हंटलं आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची एकजूट आणि मेहनतीचे सुद्धा यावेळी त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

या पत्रात पुढे म्हंटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या तुम्ही पाठीशी आहात. या विजयाने राज्याच्या विकासाला नवीन दिशा मिळणार आहे. हे यश राज्याच्या प्रगतीचं आहे, असंही फडणवीस यांनी म्हंटलं आहे. कारण अपेक्षेपेक्षा जास्त घवघवीत यश हे विधानसभा निवडणुकीच्या निकालातून महायुतीला मिळालं आहे. त्यामुळे मी तुमच्यापुढे नतमस्तक होतो, असा या पत्राचा आशय आहे.

Devendra Fadanvis News Update
Sharad Pawar : मी घरी बसणारा नाही; विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी सांगितला पुढील प्लान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com