Beed  Saam Tv
Video

Beed: बायोलॉजीच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट, नातेवाईकांनी बांबूच्या सहाय्याने पुरवल्या कॉपी; VIDEO व्हायरल

Beed Copying Racket Exposed: बीडमध्ये बायोलॉजीच्या पेपला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. बारावीच्या विद्यार्थ्यांना नातेवाईकांनी बाबूच्या सहाय्याने कॉपी पुरवल्या. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

बीडमध्ये कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. बारावीच्या बायोलॉजीच्या पेपरदरम्यान विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज प्रत्येक सेंटरमध्ये बसवण्यात आले. मात्र आज बारावीच्या शेवटचा बायोलॉजीचा पेपर असताना पेपरला थेट नातेवाईकांकडून कॉलेजच्या पाठीमागच्या साईडला बांबूच्या सहाय्याने कॉपी पुरवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बांबूला कॉपी बांधत विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या. हा संपूर्ण प्रकार बीडच्या शिरूर तालुक्यातील विद्यालयांमध्ये घडला आहे. याआधी देखील बीडमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या कॉपी प्रकारावर काय कारवाई केली जातेय ते पाहणे महत्वाचे राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT