Kolhapur News SaamTv
Video

Kolhapur Breaking : मधुरिमा राजेंची माघार अन् कोल्हापुरात वाद; सतेज पाटील शाहू महाराजांवर भडकले! | VIDEO

Shahu Maharaj - Satej Patil Dispute : कोल्हापुरात महाविकास आघाडी आणि कॉंग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मधुरिमा राजे यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.

Saam Tv

कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील आणि शाहू महाराज यांच्यात टोकाचे वाद झालेले पाहायला मिळत आहे. मधुरिमा राजेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने हा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. सतेज पाटील हे मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्याने नाराज झालेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्याचं कोल्हापुरात बघायला मिळत आहे.

कोल्हापूरतून मधुरिमा राजे यांनी माघार घेताच आता त्यावरून नाराजी नाट्य सुरू झालं असून त्यामुळे महाविकास आघाडी आणि कॉंग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शाहू महाराज आणि सतेज पाटील यांच्यात हा वाद झाला आहे. शाहू महाराज छत्रपती यांनी नाईलाजाने माघार घेत असल्याचं म्हणत त्यांनी मधुरिमा राजे यांची कॉंग्रेसची उमेदवारी मागे घेतली. मात्र त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने सतेज पाटील हे चांगलेच नाराज झालेले दिसले. त्यानंतर सतेज पाटील हे मालोजीराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. यावेळी 'तुम्ही जे केलं ते बरोबर नाही. माघार घ्यायचीच होती तर अगोदर का नाही सांगितलं? मला तोंड घाशी का पाडलं? माझी नाचक्की का केली? असा सवाल सतेज पाटील यांनी छत्रपती शाहू महाराज आणि मालोजीराजे यांच्यापुढे उपस्थित केला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भास्कर जाधव यांची विधानसभा गटनेते पदी नियुक्ती

WTC Points Table : टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा उलटफेर

Gulkand: गुलकंदापासून बनवा 'हा' खास पदार्थ, पाहता क्षणी तोंडाला सुटेल पाणी

Laxman Hake: नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी

Almonds: तुम्ही बदाम जास्त प्रमाणात खाता का? तर आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT