Nana Patole Nagpur News SaamTv
Video

'टायपिंग मिस्टेक'च्या विधानावर पटोलेंचा राऊतांवर पलटवार; बघा पटोलेंनी काय सल्ला दिला

संजय राऊत यांनी दक्षिण सोलापूरच्या जागेवरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज या विषयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

काँग्रेसला कोकणात जागा मिळाला नाही. मग आम्ही काय करायचे? संजय राऊत यांनी हा विषय आता संपवला पाहिजे. आपल्याला आपसात नव्हे तर महायुतीविरोधात लढा द्यायचा आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आपली भूमिका ही त्यांच्याविरोधात मांडली पाहिजे, असा निर्वाणीचा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना दिला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या मुद्दयावरून सोमवारी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसने सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात दिलेल्या उमेदवारीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना आपसात नव्हे तर महायुतीविरोधात लढण्याचा सल्ला दिला आहे.

‘संजय राऊत यांची नाराजी हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. आम्हालाही कोकणात एकही जागा मिळाली नाही. मग आम्ही काय करायचे? कुणाला किती जागा मिळाल्या हा विषय नाही. संजय राऊत यांनी हा विषय क्लोज केला पाहिजे. आपल्याला महायुतीविरोधात लढायचे आहे. त्यामुळे त्यांनी आपली तोफ विरोधकांवर डागली पाहिजे हा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे.’ असं पटोले यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP News : फडणवीसांचा वरचष्मा : भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Nanded Lok Sabha : नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला; भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

Rohit Sharma: रोहितला संघात घेण्यासाठी मुंबईने किती रक्कम मोजली होती?

तामिळ भाषेत चहाला काय म्हटलं जातं? फारच वेगळं आहे नाव!

World : जगात 'या' देशात आहे फक्त एक हॉस्पिटल

SCROLL FOR NEXT