Congress Protest Saam Tv
Video

Congress Protest : रस्त्यांवरील खड्ड्यांवरून सतेज पाटील यांनी महायुती सरकारला घेरलं, पाहा VIDEO

Satej Patil Protest Against Mahayuti Goverment ON Wrost Road: कोल्हापूरमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात कॉंग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे.

Rohini Gudaghe

मुंबई: पश्चिम महाराष्ट्रातील पुणे-बेंगळुरू महामार्गाची खूप दुर्दशा झालेली आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत, तरीही प्रशासन मात्र सक्तीने टोल वसुली करत आहे. याविरोधात मात्र आता कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वच टोलनाक्यांवर कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील किनी टोल नाका परिसरात देखील आंदोलन सुरू आहे.

यावेळी कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केलीय. महायुतीचे नेते हेलिकॉप्टर आणि विमानातून फिरतात, त्यामुळे त्यांना रस्त्यांवरील खड्डे दिसत नाही, असा आरोप सतेज पाटील यांनी केलाय. जोपर्यंत रस्त्यांवरील खड्डे दुरूस्त होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा सतेज पाटील यांनी घेतलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT