मी वैयक्तिक या विषयावर कोणतीही टीकाटिप्पणी करणार नाही. काल माझे जे स्टेटमेंट होते, तेच आहे. काल सायंकाळीसुद्धा मी माझ्याकडून वाद होईल असे कोणतेही विधान करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावर मी ठाम आहे. घडलेल्या घटनेवर बोलून नवा वाद निर्माण करायचा नाही. आम्हाला छत्रपती शाहू महाराजांविषयी आदरच आहे. गादीचा सन्मान ठेवणे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे व राहील, असं काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हंटलं आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मधुरिमा राजे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे याठिकाणी कुणाला पाठिंबा द्यायचा? हा मोठा प्रश्न काँग्रेसपुढे उद्भवला. या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी आज काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या येथील अजिंक्यतारा कार्यालयात महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात या मतदारसंघातून कुणाला पाठिंबा द्यायचा? यावर खलबते झाली असून आज सायंकाळपर्यंत यासंबंधीचा अंतिम निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर पाटील यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी कालचा प्रश्न आपल्यासाठी संपला असल्याचे स्पष्ट केलं. ते म्हणाले, कालच्या विषयावर मी पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जे घडले ते घडले. त्यावर आता भाष्य करण्याची गरज नाही. आता पुढे कशा पद्धतीने जावे यावर मी महाविकास आघाडी म्हणून मी करणार आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून सर्वच घटकपक्ष प्रचंड राबले होते. या विधानसभेलासुद्धा सर्वांनी तशीच मदत करावी हा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.