अकोल्यातील हिवरखेडमध्ये काँग्रेस नेता झाला शिंदे सेनेचा स्वीकृत नगरसेवक 
Video

Maharashtra Politics : राजकारणात चाललंय काय? काँग्रेसचा नेता झाला शिंदेसेनेचा स्वीकृत नगरसेवक

Akola Political News : राजकारणात काहीही घडू शकतं अशी आजची परिस्थिती आहे. अकोटमध्ये भाजपचा नेता एमआयएमच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर आता हिवरखेड नगरपालिकेत काँग्रेस नेते श्यामशील भोपळे हे शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक झाले आहेत.

Nandkumar Joshi

अक्षय गवळी, अकोला

अंबरनाथमध्ये भाजपला काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. टीका झाल्यानंतर काँग्रेसनं त्या १२ नगरसेवकांना निलंबित केलं. काही तासांतच त्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अकोटमध्ये भाजप नेता एमआयएमच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक झाला. बदलापूरमध्येही बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आपटेला भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलं. चौफेर टीका आणि जनतेतून संताप व्यक्त झाल्यानंतर काही तासांतच आपटेनं राजीनामा दिला. कोण कोणत्या पक्षात कधी जाईल किंवा कोण कुणाला पाठिंबा देतो, हेच सध्या कळत नाही. सर्वसामान्य जनता या राजकीय परिस्थितीमुळं संभ्रमात आहे. अकोला जिल्ह्यातही असंच काहीसं राजकारण सुरू आहे. अकोटनंतर हिवरखेड नगरपालिकेत वेगळी युती बघायला मिळाली. अकोटमध्ये भाजप नेता एमआयएमच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक झाला. तर हिवरखेडमध्ये काँग्रेस नेते श्यामशील भोपळे हे शिंदेंच्या शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक झाले.

२० सदस्यीय हिवरखेड नगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे पाच नगरसेवक आहेत. तर भोपळे हे काँग्रेसचे तेल्हाराचे माजी तालुकाध्यक्ष. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हिवरखेडच्या प्रभाग क्रमांक आठमधून ते पराभूत झाले. आता हेच भोपळे शिंदेंच्या शिवसेनेच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक झाले. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या अकोल्यातील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

हिवरखेड नगरपालिका पक्षीय बलाबल :

एकूण जागा : २०

सध्याचे पक्षीय बलाबल :

भाजप : ११

शिंदेसेना : ०५

काँग्रेस : ०२

वंचित : ०१

एम़आयएम : ०१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

ऐन निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले, कारण काय?

अजितदादांच्या जाहीरनाम्यात मेट्रो प्रवास मोफत, फडणवीसांनी उडवली दादांची खिल्ली

SCROLL FOR NEXT