Dhangekar News Saam tv
Video

Ravindra Dhangekar : सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता! धंगेकरांचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

Dhangekar Serious Accusation On Mahayuti : निवडणूका हायजॅक करून प्रत्येक मतदारसंघात 50 कोटी रुपये वाटण्यात आले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

Saam Tv

निवडणूका हायजॅक करण्याचा प्रयत्न झालाय, असा आरोप कॉंग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांनी सरकारी पैसा निवडणुकीत लावला आणि प्रत्येक मतदारसंघात 50 कोटी वाटल्याचा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे.

गेल्या पाच वर्षात शिंदे सरकारने भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आहे. या भ्रष्टाचाराचे करोडो रुपये त्यांनी या विधानसभा निवडणुकीत वापरले आहेत. योजना हातात घेऊन शासनाचा पैसा निवडणूकीत वापरण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रत्येक मतदारसंघात महायुतीने 50 कोटी रुपये निवडणुकीत वाटले आहेत. हा सगळा पैसा टेंडरमार्फत गोळा केला गेला आहे. आम्ही लाडकी बहिण योजना कायम ठेवू हे सांगण्यात कमी पडलो. मात्र सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सूत्र महायुतीने वापरलं आहे. निवडणूकीत जातीय समिकरणंही वापरली गेली. जातीय समिकरणं, विषारी प्रचार, आणि योजनांचा वापर असाच होत राहिला तर सामाजिक कार्यकर्त्याला निवडणूकीत उतरणं अवघड आहे. काल निवडणूका झाल्या आणि आज आम्ही परत सेफ झालो. पुढच्या ५ वर्षांनी परत जातीय-धार्मिक राजकारण डोकं वर काढेल, असे गंभीर आरोप धंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर लावले आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT