Maharashtra CM Devendra Fadnavis saamtv
Video

Maratha Aarakshan: कायद्यात सरसकट बसत नाही म्हणून सरसकट नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान

Maharashtra CM Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Priya More

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या अनेक मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केल्या. त्यामधील हैदराबाद गॅझेटसंदर्भातील मागणीचा सरकारकडून जीआर देखील काढण्यात आला. हा जीआर हाती आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. त्यांनी लिंबू पाणी पित उपोषणाच सोडलं. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'मनोज जरांगे पाटील यांची सरसकट मागणी कायदेशीर अडचणी होत्या. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय सरसकट करणे शक्य नव्हतं. ही वस्तुस्थिती मंत्रिमंडळ उपसमितीने त्यांच्या लोकांच्या लक्षात आणून दिली. देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं, व्यक्तीला मिळत असतं. आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं. त्यामुळे सरसकट करता येणार नाही आणि ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही ही भूमिका समजून त्यांनी स्वीकारली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT