eknath shinde news SaamTv
Video

VIDEO : विधानसभेतील विजयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक | Marathi News

Maharashtra Assembly Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भावुक झालेले दिसून आले.

Saam Tv

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे वादळ दिसून आले. 2014 मध्ये मोदी लाटेत देखील एवढा मोठा विजय भाजपला मिळाला नव्हता. तेवढा विजय या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवला आहे. भाजप राज्यातील एकमेव सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. इतर कोणत्याही पक्षाला तीन आकडी आकडा गाठता आलेला नाही. दरम्यान, या विजयाच्या जल्लोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भावुक झालेले दिसले. यावेळई पानावलेल्या डोळ्यांनी त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केल्याचं दिसून आलं.

महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू आहे. यात सुरुवातीच्या कलातच महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळतांना दिसली. पहिल्या दोन तासांत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कांटे की टक्कर झाली. मात्र सकाळी 10.30 नंतर भाजप महायुतीचा कल एकतर्फी विजयाकडे गेला. सध्या 200 हून अधिक जागा महायुतीला मिळताना दिसत आहेत. काही जागांवर विजय निश्चित झाला आहे. तर काही जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. यात भाजपला सर्वाधिक 229 जागांवर आघाडी आहे. तर शिंदेसेनेला 56 जागांवर आघाडी आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 39 ठिकाणी आघाडी मिळतांना दिसत आहे. या एकतर्फी विजयानंतर महायुतीकडून जल्लोष करण्यात येत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देखील विजयाचा जल्लोष केला. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भावुक झालेले दिसून आले.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

SCROLL FOR NEXT