mumbai to shirdi vande bharat journey by CM devendra fadnavis saam tv
Video

CM फडणवीसांचा वंदे भारत ट्रेनने प्रवास; मुंबईवरून शिर्डीला पोहोचल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Shares Experience After Travelling in Vande Bharat Express : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई ते शिर्डी प्रवास वंदे भारत ट्रेनने केला. वंदे भारत ट्रेनने केलेल्या प्रवासाचा अनुभव त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितला.

Nandkumar Joshi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना इंधन बचतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत बुलेटवरून प्रवास केला होता. आता तर त्यांनी मुंबई- शिर्डी प्रवास वंदे भारत ट्रेनने केला आहे. या प्रवासानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच वंदे भारत ट्रेनच्या प्रवासाचा अनुभव सांगितला.

वंदे भारत ट्रेन नवभारताची अनुपम भेट असून, ती मोदींनी आपल्याला दिली आहे. जगातील विकसित राष्ट्रांमध्ये जशा ट्रेन आहेत, तशी ही ट्रेन आहे. याच ट्रेनने मुंबईवरून शिर्डीला आलो. खूप चांगला अनुभव होता. अनेक लोकांच्या भेटी झाल्या. प्रवासात काम देखील करता आलं. त्यामुळे आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

जिथे शक्य आहे त्या ठिकाणी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार काम करावे. आपण केलं तर लोकांना देखील त्याचं अनुकरण करण्याची इच्छा होते. तोच माझा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील पेट्रोल-डीझेल टंचाईवरही त्यांनी भाष्य केलं आहे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पेट्रोल-डीझेल पुरवठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT