Bharat Jadhav
तुम्ही भाड्याच्या घरात राहता का? वर्षाचे पूर्ण १२ महिने तुम्ही तेथे राहत असाल बरोबर,पण तुमचं रेंट एग्रीमेंट फक्त ११ महिन्यांचेच का बनवलं , असा प्रश्न कधी पडलाय का तु्म्हाला? यामागील कारण काय?
भारतीय कायद्यानुसार जर कोणतेही रेंट एग्रीमेंट १२ महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी केले. तर ते सब-रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन नोंदणीकृत करणे कायद्याने बंधनकारक अस
जेव्हा एखादे एग्रीमेंट सरकारी कार्यालयात रजिस्टर्ड केले जाते, तेव्हा त्यासाठी मोठी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी मोजावी लागते. हा मोठा आणि अतिरिक्त खर्च वाचवण्यासाठी मालक आणि भाडेकरू दोघेही संमतीने ११ महिन्यांचाच करार करतात.
११ महिन्यांचे रेंट एग्रीमेंट हे फक्त १०० ते ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून सहज तयार करता येते. यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत नाहीत.
कायद्याच्या दृष्टीने ११ महिन्यांचे नोटरी केलेले एग्रीमेंटही पूर्णपणे वैध असते. भविष्यात घरमालक आणि भाडेकरू यांच्यात काही वाद झाला तर हे एग्रीमेंट कोर्टात पुरावा म्हणून सादर करता येतो.
११ महिने पूर्ण झाले म्हणजे घर खाली करावे लागेल असे अजिबात नाही. करार संपल्यानंतर दोन्ही पक्षांच्या संमतीने रेंट एग्रीमेंट पुन्हा नूतनीकरण करता येते. जर भाडेकरूला तिथे राहायचे नसेल, तर तो घर सोडू शकतो.