Devendra Fadnavis  Saam t
Video

Devendra Fadnavis : फरार आरोपींची संपत्ती जप्त करा; संतोष देशमुख हत्या प्रकरणात CM फडणवीस अॅक्शन मोडमध्ये,VIDEO

Devendra Fadnavis Latest news : संतोष देशमुख हत्या प्रकरणात CM फडणवीस अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. सरपंच हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्च्याला सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली होती. या मोर्च्यात सर्व पक्षीय नेत्यांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. विरोधकांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे आरोपींच्या गळ्यावरील फास आणखी आवळल्याचे बोललं जात आहे.

बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्च्याला मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. या मोर्च्यात लोकांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच यावेळी लोकांनी आरोपीच्या संपत्ती जप्त करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:बारामतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन; शारदा प्रांगणात मुक्काम

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT