Mumbra local train accident leaves 6 dead; CM Fadnavis cancels Solapur visit and expresses deep sorrow over the tragedy.
Mumbra local train accident leaves 6 dead; CM Fadnavis cancels Solapur visit and expresses deep sorrow over the tragedy. Saam TV News
Video

Mumbai Local Accident : लोकल अपघातात ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा रद्द

Mumbai Local Accident Mumbra diva station : मुंब्रा स्थानकात दोन लोकलच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला नियोजित सोलापूर दौरा रद्द केला.

Namdeo Kumbhar

Mumbai Local Accident Mumbra diva station News : मुंब्रा स्थानकात दोन लोकलच्या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. दोन लोकल एकमेकांना घासल्यामुळे दारात उभे असणारे प्रवाशी खाली कोसळले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजित सोलापूर दौरा रद्द केला. त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आणि जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला सोलापूरचा दौरा रद्द केला. हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत सोलापूर - गोवा विमानसेवा समारंभ पार पडणार आहे. मुंबईतील रेल्वे दुर्घटनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौरा करण्यात रद्द केला.

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO