Sambhajinagar SAAM TV
Video

Sambhajinagar : सिल्लोड तालुक्यात ढगफुटी सदृश्य , घाटनांद्रा परिसराचा संपर्क तुटला | पाहा VIDEO

Sillod Heavy Rain : संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अनेक भागात रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. घाटनांद्रा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने घाटनांद्रा गावाचा परिसरातील गावाशी संपर्क तुटला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात रात्री मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. घाटनांद्रा परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद झाली असून गावाचा संपर्क परिसरातील इतर गावांशी तुटला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागातील घरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चारनेर पुलावरून प्रचंड पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आज सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर कायम राहिल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT