Nanded News Update SaamTv
Video

Nanded News : नांदेडमध्ये मतमोजणीदरम्यान दोन गटात तूफान राडा

Clashes Between Two Groups In Nanded : नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे तहसील कार्यालय परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पार पडत असताना केंद्राच्या बाहेर दोन गटांमध्ये तूफान राडा झालेला बघायला मिळाला आहे.

Saam Tv

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे तहसील कार्यालय परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पार पडत असताना केंद्राच्या बाहेर दोन गटांमध्ये तूफान राडा झालेला बघायला मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असलेल्या नांदेडच्या लोहा येथे दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावपूर्ण शांतता पसरली आहे. या प्रकारामुळे येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आधी हा किरकोळ वाद होता. त्यानंतर मात्र या वादाचं रूपांतर राड्यात होऊन तूफान दगड फेक सुरू झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवले असून याठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT