Chinchoti waterfall Saam TV
Video

Vasai : मज्जा पडली महागात; गोरेगाव महाविद्यालयातील दोन तरुण चिंचोटी धबधब्यात बुडाले | VIDEO

Chinchoti waterfall : नायगावच्या चिंचोटी धबधब्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.दोघंही मुंबईतील गोरेगावमधील महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नायगावच्या चिंचोटी धबधब्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रल्हाद सहजरवा आणि सुशील डबाळे अशी मृत तरुणांची नावं असून, हे दोघंही मुंबईतील गोरेगावमधील महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी त्यांच्या मित्रांसह ते चिंचोटी धबध्यावर गेले होते. मात्र धबध्याच्या जोरदार प्रवाहात ते दोघं पाण्यात वाहून गेले आणि बुडून मृत्युमुखी पडले.

या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाने अशा धबध्यांवर पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT