Dharashiv Saam TV
Video

Dharashiv : धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक, राष्ट्रवादीचे बॅनर फाडले | VIDEO

Chhava Protest Dharashiv : छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष चिघळला आहे. धाराशिवमध्ये छावा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूरमधील घटनेनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, आज धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर त्यांनी जोरदार आंदोलन केले आहे. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी बॅनर फाडले, पत्ते फेकले आणि कार्यालयावर दगडफेक करत परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण केले.

संघर्ष अधिकच चिघळल्याचं चित्र असून, राष्ट्रवादी काँग्रेस व छावा संघटनेत तणाव शिगेला पोहोचला आहे. आंदोलन अचानक पेटल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: असं रुपडं देखणं त्याला सुर्याचं रे दान...

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ नाराज नाहीत, त्यांच्या मनातील शंका दूर करू - मुख्यमंत्री फडणवीस

Public Holiday 2025 : ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे की नाही? महत्वाची माहिती आली समोर

आधी मंदिरात लग्न नंतर जंगलात बलात्कार; ६० वर्षीय वृद्धाचं १५ वर्षीय मुलीसोबत हैवानी कृत्य

GST गिफ्टसाठी दिवाळीऐवजी नवरात्रीचा मुहूर्त साधला, मोदी सरकारचा नेमका मास्टरप्लॅन काय?

SCROLL FOR NEXT