Chhatrapati Sambhajinagar Tragedy Saam
Video

शिवाजीनगर भुयारी मार्गावर दुचाकी घसरून अपघात; ६४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Tragedy: छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघाताची घटना. इलेक्ट्रिक स्कूटीस्वाराचा जागीच मृत्यू. गावात हळहळ

Bhagyashree Kamble

  • शिवाजी भुयारी मार्गावर दुचाकी घसरून भीषण अपघात.

  • ६४ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू.

  • गावात हळहळ.

छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे रुळाखाली असलेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गावर एक भीषण अपघाताची घटना घडली. दुचाकीस्वार खाली घसरून पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान, दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अंकुश भाऊराव शंकपाळ (वय वर्ष ६४, रा. चिकलठाणा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी शंकपाळ हे इलेक्ट्रिक स्कूटी सर्व्हिसिंगसाठी बीड बायपास येथे घेऊन जात होते. शिवाजीनगर भुयारी मार्गातून जाताना त्यांची दुचाकी घसरली. डोक्याला जोराचा मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदत करून त्यांना खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारांना त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अंकुश शंकपाळ यांच्या नातेवाइकांनी शिवाजीनगर भुयारी मार्ग बांधणाऱ्या अभियंता, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेबाबत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. संकपाळ यांना दोन मुले असून ते शेती करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोणत्या पुलाखालून जायचंय? कुठे घ्यायचा टर्न, Mappls सुचवेल योग्य रस्ता; Google Maps देणार टक्कर

Health Tips: झोप लागली नाही तर शरीरात काय परिणाम होतात?

Diwali Trip Near Pune: दिवाळीच्या सुट्टीत धमाल करायचीये? मग पुण्यातल्या या पिकनिक स्पॉट्सला नक्की भेट द्या

लाडकी बहीण योजनेतून ६० लाख महिलांना वगळणार; आमदाराला भीती, लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं!

धावती लोकल पकडताना महिलेचा पाय घसरला अन्.. पालघर रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT