Imtiaz Jaleel Attack Saam Tv
Video

Imtiaz Jaleel Attack: इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला झाला तो क्षण, पाहा VIDEO

Sambhajinagar Politics: संभाजीनगरमध्ये एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. संभाजीनगरमध्ये पदयात्रा सुरू असताना संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना मारहाण केली.

Priya More

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. इम्तियाज जलील यांना संभाजीनगरमधील मुस्लिम बहुल भागातूनच विरोध होताना दिसत आहे. आज इम्तियाज जलील हे संभाजीनगर शहरातील बाईजीपुरा भागात पदयात्रेसाठी गेले होते. याठिकाणी त्यांना विरोध करण्यात आला. निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यामुळे संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.

संतप्त नागरिकांनी इम्तियाज जलील यांची पदयात्रा आडवत काळे झेंडे दाखवले आणि घोषणाबाजी देखील केल्या. नागरिक आणि कार्यकर्त्यांचा विरोध पाहता इम्तियाज जलील यांनी आपला मोर्चा दुसऱ्या गल्लीत वळवला. पण विरोध जास्त होत असल्याचे पाहून ते कारमध्ये बसले आणि ते तिथून निघून जाऊ लागले. त्यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर हल्ला करण्यास सुरूवात केली. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर बुक्क्या आणि लाथा मारल्या. यावेळी त्यांनी इम्तियाज जलील यांना देखील सोडले नाही. कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना देखील मारहाण केली. इम्तियाज जलील यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जयशंकर यांचा एक फोन अन् भारताचं गॅसचं टेन्शन मिटलं; इराणने घेतला सर्वात मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : गॅस सिलिंडरच्या तुटवड्याविरोधात काँग्रेस नेत्यांच आंदोलन

Nashik Crime : नाशिकमध्ये नदीत आढळलेल्या मृतदेहाचं गुढ समोर; पत्नीने भाऊ आणि प्रियकराच्या मदतीने रचला कट

Summer Season Blouse Designs: उन्हाळ्यात डेली वेअरसाठी 'स्लीव्हलेस' की 'एल्बो लेंथ' कोणता ब्लाऊज पॅटर्न निवडावा?

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १०,९०० रुपयांनी झालं स्वस्त, तुमच्या शहरातील २४- २२ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT