sambhajinagar news  Saam Tv
Video

'तू खूप क्यूट आहेस' म्हणाला अन्...; स्कूल बसचालकाचं 9 वर्षांच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य|VIDEO

School Bus Driver Molestation: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार सामोर आला आहे, तु खूप क्युट आहे असे म्हणत स्कूल बस चालकाने 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला आहे.

Omkar Sonawane

माधव सावरगावे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगर: स्कूल बस चालकाने ९ वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत विनयभंग केल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलीय. ३० जुलै रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी ३० वर्षीय स्कूल बस चालक गणेश संपत म्हस्के याच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

शहरातील एका खाजगी शाळेत चौथीच्या वर्गात शिकणारी ९ वर्षाची मुलगी ३ वर्षापासून व्हॅनने ती जाते. ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता व्हॅनमधील सर्व मुले उतरल्यानंतर घरापासून काही अंतरावर व्हॅन थांबवत गणेशने तिचा हात पकडला. तू खूप क्युट आहेस, उद्या आपण दोघे फिरायला बाहेर जाऊ, तू घरी तुझ्या आईवडिलांना सांग शाळेतून येण्यास उशीर होणार आहे, असे म्हणाला.

घाबरलेली मुलगी थांबा आल्यावर घरी गेली. सायंकाळी आई कामावरून घरी परतल्यावर तिने रडत हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. हा संतापजनक प्रकार ३० जुलै रोजी घडल्यावर त्यावर ३१ जुलै रोजी कारवाई करण्यात आली. मात्र, शहर पोलिसांकडून या गुन्ह्याची माहिती लपवण्यात आली. त्यामुळे शाळेला पाठीशी घालण्याचा काही प्रयत्न पोलिस करत होते का, असा संशय निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

SCROLL FOR NEXT