नाशिकमध्ये त्यांनी इगतपुरी, दिंडोरी आणि देवळाली येथे एबी फॉर्म पाठवले होते. पण इगतपुरी येथील उमेदवार मनसेमध्ये गेल्याने तेथे फॉर्म पाठवला नाही. नाशिकमध्ये महायुतीतील पक्षांकडून देण्यात आलेल्या दोन-दोन उमेदवारांबाबत अजित पवार आणि सगळी मंडळी बसून चर्चा करतील, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदेंनी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवण्याच्या प्रकरणावर दिली आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार यांच्या विरोधात नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेरच्या क्षणी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवत बंडखोरी केल्याचं काल दिसून आलं. देवळाली मतदारसंघासाठी माजी तहसीलदार राज्यश्री आहेरराव आणि दिंडोरी मतदारसंघात धनराज महाले यांच्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून हेलिकॉप्टरनं एबी फॉर्म पाठवले होते. त्यामुळे महायुतीतील वादाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आज मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया देत याबद्दल पक्षश्रेष्ठी बसून चर्चा करेल असं म्हंटलं आहे. त्याचबरोबर अनेक मतदारसंघात दोन-दोन उमेदवार देण्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली असून केवळ नाशिकच नाही तर इतर अनेक ठिकाणी दोन-दोन उमेदवारंनी फॉर्म भरले आहेत. 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल, असं म्हंटलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.