Chhagan Bhujbal SaamTv
Video

Chhagan Bhujbal Breaking News : 'भाजपबरोबर गेल्याने ईडीपासून मुक्ती झाली', भुजबळांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Maharashtra Politics: ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर गेलो असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ''२०२४ द एलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया'' या पुस्तकात त्यांनी हा दावा केला आहे.

Saam Tv

ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर गेलो असा मोठा गौप्यस्पोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ओबीसी असल्याने माझ्यावर कारवाई झाली असा मोठा दावा देखील भुजबळ यांनी केला आहे. तर माझ्यासाठी ईडीपासून सुटका म्हणजे पुनर्जन्म आहे, अशी छगन भुजबळ यांनी म्हंटलं आहे. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. ''२०२४ द एलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया'' या पुस्तकात त्यांनी हा दावा केला आहे.

भाजपसोबत गेल्यावर ईडीच्या कारवाईपासून वाचता येतं असे अनेक आरोप आत्तापर्यंत राज्यातील विरोधी पक्षांकडून करण्यात आले आहे. मात्र आता थेट सत्ताधारी भाजपच्या मित्रपक्षातील मंत्र्यानेच याबाबत मोठा खळबळजनक दावा केला असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपबरोबर गेलो म्हणून ईडीच्या कारवाईतून मुक्ती मिळाली असा धक्कादायक दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या '२०२४ द एलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया' या पुस्तकातून त्यांनी हा मोठा खुलासा केला आहे. या पुस्तकातून अनेक मोठे खुलासे सरदेसाई यांनी केलेले आहेत. मात्र छगन भुजबळ यांनी ईडी संदर्भात केलेल्या खुलाशाने आता सगळ्यांचं लक्ष या पुस्तकाकडे वेधलं आहे. 'मी ओबीसी असल्याने माझ्यावर कारवाई झाली, मात्र मी भाजपबरोबर गेल्याने मला ईडीपासून सुटका मिळाली. माझ्यासाठी ईडीपासून मुक्ती म्हणजे पुनर्जन्म आहे. आजही मला झोपेत तुरुंगातले दिवस आठवले तर मला कसंतरी होतं', असा मोठा गौप्यस्पोटच भुजबळ यांनी पुस्तकातून केला आहे. दरम्यान, ईडीच्या कारवाईपासून सुटका करण्यासाठीच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यानी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशा आशयाचे अनेक संदर्भ या पुस्तकातून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता एन विधानसभा निवडणुकीत या पुस्तकामुळे मोठी राजकीय खळबळ राज्यात उडलेली बघायला मिळत आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nimrat Kaur: निम्रत कौरनं रिलेशनशिपबद्दल स्पष्टच सांगितलं?

Maharashtra News Live Updates: उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरांत आग लावणारी- एकनाथ शिंदे

Sushma Andhare: सुषमा अंधारेंचं शिक्षण किती?

Navapur Vidhan Sabha : काँग्रेसचा गड असलेल्या नवापूर विधानसभेत तिरंगी लढत; अपक्ष उमेदवार शरद गावितांचे आव्हान

Maharashtra Election : शरद पवार खमक्या माणूस; महायुतीच्या स्टेजवरच रामदास आठवलेंकडून कौतुकवर्षाव

SCROLL FOR NEXT