Chhagan Bhujbal Latest News Saam TV News
Video

Chhagan Bhujbal : निकृष्ट घरं का बांधली जातायत? पहिल्याच कॅबिनेटमध्ये भुजबळांचे प्रश्न

Chhagan Bhujbal Latest News : छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत अनधिकृत घरे, SRA मधील निकृष्ट बांधकाम आणि नाशिकमधील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत प्रश्न उपस्थित केले.

Namdeo Kumbhar

Chhagan Bhujbal Latest News : छगन भुजबळ यांनी आज मंत्रिमंडळाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. अनधिकृत घरे बांधली जात आहेत, तसेच SRA मध्ये जी घरे बांधली जात आहेत, त्यावर भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला.

मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये भुजबळ यांनी काही प्रश्न उपस्थित केले. नाशिक येथे पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, याबाबत भुजबळ यांनी नुकसान भरपाई निमित्ताने प्रश्न उपस्थित केला. घरांच्या बाबतीत अनधिकृत घरे बांधली जात आहेत, तसेच SRA मध्ये जी घरे बांधली जात आहेत, त्यावर प्रश्न उपस्थित केला. तसेच पंतप्रधान आवास योजनेप्रमाणे योजना असताना इतकी निकृष्ट घरे का बांधली जात आहे? असाही प्रश्न उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

देवेंद्र फडणवीस यांनी 'माझे धोरण माझे घर' हे गृहनिर्माण धोरण जाहीर केले. यात सर्वसमावेशक गृहनिर्माण, लोकसंख्या, कामगारांचा विचार, महा आवास पोर्टल, शासकीय मॅपिंगद्वारे किंमती कमी करणे, नवे तंत्रज्ञान, शाश्वतता, SRA व रिहाब इमारतींची सुधारणा, पाणी व अग्निशमन यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Swapna Shastra: स्वप्नात मेलेली व्यक्ती दिसली तर काय संकेत मिळतात?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होणार; नवीन सॅलरी स्ट्रक्चर कधी येणार?

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा, राज ठाकरेंनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल|VIDEO

Police Viral Video : पोलीस दारू पिऊन २० रुपये हप्ता घ्यायचा, डोंबिवलीतील हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT