Chhagan Bhujbal News SaamTv
Video

Chhagan Bhujbal : 'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं.. ', छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य; अजित पवारांची साथ सोडणार? पाहा VIDEO

Mahayuti Cabinet Expansion News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला आहे. यात छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाल्याने त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

Saam Tv

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांनी आता राज्यसभेवर देखील जाण्यास नकार दिला आहे. राज्यसभेवर आता जाणं म्हणजे मतदारांच्या विश्वासासोबत प्रतारणा करण्यासारखं होईल, असं भुजबळ म्हणाले आहेत. तसंच 'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं.. ', असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ आता पुढे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

यावेळी बोलताना भुजबळ यांनी म्हंटलं की, आठ दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर जा, असं पक्षाकडून सांगण्यात आलं. मी पूर्वी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होतो. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर आता मी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नाही, असं मी पक्षाला स्पष्टपणे कळवलं आहे. मला माझ्या मतदारांनी निवडून दिले आहे. मग आता मी जर राज्यसभेवर गेलो, तर ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. तसंच आपण नाराज असल्याचं देखील त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील भुजबळ यांची लोकसभा लढवण्याची इच्छा होती. मात्र पक्षाने त्यांना संधी दिली नव्हती. त्यावेळी देखील ते काहीसे नाराज झाले होते. यावेळी देखील विधानसभा निवडणुकीनंतर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भुजबळ यांना डावलण्यात आलं आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे देखील आता भुजबळ नाराज असल्याचं समोर आलं आहे. आपण नाराज असल्याचं देखील त्यांनी उघडपणे जाहीर केलं आहे. यावर पक्षश्रेष्ठींकडून भुजबळ यांना योग्य ती दुसरी जबाबदारी दिली जाईल, त्यांचा मान ठेवला जाईल, अशी सारवासारव करण्यात आली होती. मात्र आता भुजबळ यांनी ज्या प्रकारे राज्यसभेवर जाण्यास नकार दिला आहे आणि 'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं.. ', असं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता भुजबळ काय भूमिका घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT