Chhagan Bhujbal saam tv
Video

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी घेतली सूर्यवंशी कुटुंबाची भेट

Chhagan Bhujbal Meets Suryawanshi Family: माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली असून ते याबाबतची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आसल्याचे ते म्हणाले.

Omkar Sonawane

माजी मंत्री छगन भुजबळ आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

परभणी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले होते, ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. परभणी रेल्वे स्थानकाबाहेर भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची कथित विटंबना करण्यात आल्याच्या घटनेनंतर शहरात हिंसाचार उसळला होता. या प्रकरणात पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेऊन परभणी जिल्हा कारागृहात ठेवले होते. याच कारागृहात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला.

मात्र, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे न होता पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर विविध राजकीय पक्षांचे नेते त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर आज छगन भुजबळ यांनी सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, कुटुंबीयांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी भुजबळ यांनी स्पष्ट केले की, कायदा सर्वांसाठी समान आहे आणि पोलिसांच्या मारहाणीमुळे जर सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असेल, तर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. ते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही संपूर्ण परिस्थिती त्यांच्या समोर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT