Chhagan Bhujbal’s name gains traction for Rajya Sabha seat after Sunetra Pawar’s resignation in a major political development. saam tv
Video

मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

Chhagan Bhujbal Chances For Rajya Sabha Seat 2026: बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा रंगली आहे.

Omkar Sonawane

बारामती पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दिल्लीत उपराष्ट्रपतींची भेट घेत त्यांनी आपला राजीनामा सुपुर्द केला असून, आता रिक्त झालेल्या जागेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, आमदार झाल्यानंतर त्यांना खासदार पदाचा राजीनामा देणं आवश्यक असल्याने त्या दिल्लीत दाखल झाल्या. आज त्यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत अधिकृतपणे राजीनामा सुपुर्द केला.

या घडामोडीनंतर आता रिक्त झालेल्या खासदारकीच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यापूर्वीही भुजबळ यांनी राज्यसभेसाठी इच्छा व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT