महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयाने 2021 मधील बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश न्यायालयाने काल दिला असून, यामुळे भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी हा खटला तांत्रिक कारणावरून रद्द केला होता. मात्र, हा निर्णय मेरिटवर नसल्याचे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे या खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे.या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार असून, त्याकडे राज्याचे राजकीय वर्तुळ आणि भुजबळ यांचे समर्थक यांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.