Chandrashekhar Bawankule SaamTv
Video

Chandrashekhar Bawankule : प्रत्येक गावात एक दिवस जिल्हाधिकारी, दोन दिवस तहसीलदार येणार | Video

Chandrashekhar Bawankule Orders To Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी प्रत्येक आठवड्यात गाव भेटी कराव्यात असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले आहेत.

Saam Tv

राज्यात महायुती म्हणून आम्ही लढणार आहे. शेवटी त्या त्या भागातील कार्यकर्त्यांची जी भावना असते ती देखील मांडवी लागते. प्रत्येक आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी गाव भेटी कराव्यात असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी एक दिवस, तर तहसीलदारांनी दोन दिवस दौरा करावा असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, आम्ही लोकसभा, विधानसभा महायुती म्हणून लढलो. लवकरच आम्ही संपर्कमंत्र्यांची नेमणूक करणार आहोत. सरकार आणि भाजपचा समन्वय म्हणून ही नेमणूक करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी राज्यात जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे. शेवटी सर्व मंत्र्यांनी जर जनता दरबार घेतले तर जनतेचेच भलं होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा ग्राऊंडवर जात आढावा घ्यावा. नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ उपाययोजना कराव्या. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जा. प्रत्येक आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी एक दिवस, तर तहसीलदारांनी दोन दिवस दौरा करावा, असे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT