Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Saam Tv
Video

Chandrapur Mayor: भाजप की ठाकरेसेना, चंद्रपुरच्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार?

Chandrapur Municipal Corporation: चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौरपदावर कुणाची वर्णी लागणार हे आज स्पष्ट होईल. महापौरपदासाठी आज दुपारी ११ वाजता महापालिकेत निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.

Priya More

चंद्रपूर महानगरपालिकेचा महापौर आज ठरणार आहे. महापौरपदासाठी आज दुपारी ११ वाजता महापालिकेत निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर कोण होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस, भाजप, ठाकरेंची शिवसेना यांनी या पदावर दावा केला असून, अंकांची जुळवाजुळव करण्यात सर्वच पक्षांची दमछाक होत आहे. महापालिकेत काँग्रेस २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. त्यापाठोपाठ २३ जागा भाजपच्या आहेत. तर ठाकरेसेनेचे वंचितसह आठ सदस्य आहेत. सत्तेचे गणित ठाकरे सेनेच्या हाती असल्याने महापौर पद आम्हाला द्या, अशी ठाम भूमिका ठाकरेसेनेने घेत इतरांना पाठिंबा देण्यास नकार दिला. पण तरीही या सेनेची चर्चा काँग्रेस आणि भाजपसोबत शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. यावर आता कोणता तोडगा निघतो, हे सभागृहात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या महापौर पदाचे चित्र अजूनही धूसर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Oil For Long Hair: लांब आणि चमकदार केसांसाठी नारळाच्या तेलामध्ये मिसळा 'हा' १ पदार्थ

भाजपचा नेत्याची गुंडगिरी; शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, पिकावरही नांगर फिरवला

SDM Kajal Meena Bribe Case: IIT मधून B.Tech, स्पर्धा परीक्षेत टॉपर; पण लाचेच्या मोहाने घात, SDM काजल यांना अटक

Face Care: डाग स्पॉट कमी करुन नॅचरल ग्लो पाहिजे असेल तर 'ही' घरी तयार केलेली फेस क्रिम नक्की लावा

Buldhana : महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं; बुलढाण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT