Minister Chandrakant Patil and MoS Murli Dhar Mohol during a meeting at Pune Police Commissioner’s office on rising crime in the city. Saam Tv
Video

पुण्यातील गुन्हेगारांचा डेटा जमा करा, बेनामी मालमत्ता शोधा आणि ईडी लावा|VIDEO

Chandrakant Patil Meeting Pune Police Commissioner: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले. बेनामी मालमत्ता शोधून गुन्हेगारांमागे ईडी लावण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Omkar Sonawane

आज मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात बैठक घेतली. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी यावर चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानंतर चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधत म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना यातून पुण्यात एक वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. कुठल्या ही गुन्हेगारांशी आमचा संबंध नाही. दिवसाला २ ते ३ हजार लोकांना भेटत असताना अनेक वेळा असे लोकं असतात. जे फोटो काढतात, पण त्यांचा आणि आमचा काही संबंध नसतो. पोलिसांना आश्वासित केलं आहे की, आमचे नाव घेऊन जरी आला किंवा आमचा जरी फोन आला तरी सोडू नका. तसेच गुन्हेगारांचा डेटा जमा करायला आम्ही पोलिसांना सांगितलं, त्यातून बेनामी प्रॉपर्टी शोधा आणि ईडीसाठी प्रयत्न करा. आम्ही दिल्लीत प्रयत्न करू आणि सगळ्यांच्या मागे ईडी लावू. असा कडक इशारा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

SCROLL FOR NEXT