Passengers stranded at Kurla station as Central Railway services remain suspended beyond the station due to ongoing block work Saam Tv
Video

मध्य रेल्वेवर प्रवाशांचा खोळंबा; कुर्ल्यापुढे लोकल सेवा बंद|VIDEO

Central Railway Train Services Halted Beyond Kurla Today: मुंबईतील मध्य रेल्वे सेवेला मोठा फटका बसला असून कुर्ल्यापुढे लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. एलफिन्स्टन पुलावरील ब्लॉकमुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला असून रेल्वेकडून वेळेवर माहिती न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील मध्य रेल्वे सेवेला आज सकाळी मोठा फटका बसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. एलफिन्स्टन पुलावरील सुरू असलेल्या ब्लॉकमुळे गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुरुवातीला मध्य रेल्वेकडून गाड्या दादरपर्यंत चालवण्यात येतील अशी माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कुर्ला स्थानकात पोहोचल्यानंतर गाड्या पुढे जाणार नसल्याच्या सूचना दिल्याने प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. कुर्ला स्थानकातच गाड्या थांबवण्यात येत असल्याने अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. दादरपर्यंत पोहोचण्याच्या अपेक्षेने प्रवास सुरू केलेल्या प्रवाशांना अचानक बदललेल्या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, सकाळी सहा वाजेपर्यंत हा ब्लॉक संपणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ठरलेल्या वेळेनंतरही ब्लॉक सुरूच असल्याने प्रवाशांचा खोळंबा वाढला असून नाराजी व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत स्पष्ट आणि वेळेवर माहिती न दिल्याचीही तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT