Amit Shaha News SaamTv
Video

Amit Shah News : मुस्लिम समाज आरक्षणावरून अमित शहा राहुल गांधींवर कडाडले, पाहा Video

Dhule News : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची भेट देशातील सर्व उलेमांनी घेतली असून त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी केली आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.

Saam Tv

देशातील सर्व उलेमांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली असून त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी केली असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे. या मुद्द्यावरून अमित शहा यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी कान उघडे ठेवून ऐकवे, की तुमची चौथी पिढी आली तरी देखील मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर एससी, एसटी, ओबीसी आणि इतर समाजातील आरक्षण कमी करून द्यावे लागणार आहे. मात्र ते होणे शक्य नाही, असं देखील यावेळी बोलताना अमित शहा यांनी म्हंटलं आहे.

आज झालेल्या धुळे येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंची सर्व तत्त्वे विसरले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, औरंगाबादच्या नामांतरला विरोध करणारे, कलम 370 हटवण्यास विरोध करणारे, पाकिस्तानविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेणाऱ्या औरंगजेब फॅन क्लबसोबत उद्धव ठाकरे असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: रॅगिंगला कंटाळला, १४ दिवसांपासून MBBS चा विद्यार्थी बेपत्ता; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील प्रकार

Maharashtra News Live: श्रीक्षेत्र रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराचे दरवाजे आजपासून पुन्हा भाविकांसाठी खुले

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या रूपाची चर्चा, सौंदर्याने सर्वांनाच केलं थक्क

Shagun Sharma: 'सेटवर त्याने खूप त्रास दिला'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौरव खन्नावर गंभीर आरोप, म्हणाली, 'तो सतत अपमान...'

August New Rules : 1 ऑगस्टपासून 5 मोठे नियम लागू; LPG सिलेंडर स्वस्त, तत्काळ तिकीट बुकिंगपासून KYC पर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT