Pune Accident Saam Tv
Video

Pune Accident: पुणे- सातारा महामार्गावर बर्निंग कारचा थरार, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Pune Burning Car Video: पुण्यात कारला भीषण आग लागली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. पुणे - सातारा महामार्गावर ही घटना घडली.

Priya More

पुणे-सातारा महामार्गावर बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. महामार्गावर एका कारला अचानक आग लागली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कार जळून खाक झाली. यावेळी चालक आणि प्रवासी वेळीच कारमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. तर शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कारला आग कशी लागली या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, पुणे- सातारा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुणे -सातारा महामार्गावर कापूरहोळ येथे मागील एक तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून अथक प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुण्यातील भाजी विक्रेत्याचा पुढाकार; नफ्याचा अर्धा हिस्सा देणार

MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आता 'या' IAS अधिकाऱ्याकडे; चौकशी समितीत तुकाराम मुंढेंची एन्ट्री

Maharashtra News Live Update: मलंगगड ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसेना आक्रमक

MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

Ideal age gap in marriage: सुखी संसारासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं?

SCROLL FOR NEXT