Candle March saam tv
Video

Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीरमध्ये कँडल मार्च, दहशतवाद्यांचा केला निषेध

Candle March Against Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी कँडल मार्च काढून श्रद्धांजली वाहिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जम्मू-काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ पहलगाममध्ये दुपारी अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला. त्यामध्ये २८ हून अधिक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि काही जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनुसार, धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या. हल्ल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांनी धावपळ करत मदतीसाठी पुढाकार घेतल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी कँडल मार्च काढत हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. हा भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा आम्ही जोरदार निषेध करतो. आमची ओळख आधी हिंदुस्तानीची आहे, त्यानंतर काश्मीरीची, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. या शांततेच्या आंदोलनातून स्थानिकांनी एकता आणि देशप्रेमाचा संदेश देत पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतिरेक्यांनी पहलगाममध्ये सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांची आधी नावे विचारली आणि नंतर थेट गोळीबार करत फरार झाले. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT