Bulldozer Poster Special Report Saam Tv News
Video

Special Report: ​महाराष्ट्राचा नवा बुलडोजर बाबा...स्पेशल रिपोर्ट!

अनधिकृत बारवरच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय. ठाणे शहरात बॅनरबाजी करण्यात आलीये.

Rachana Bhondave

Bulldozer Poster Special Report: ठाण्यात ठिकठिकाणी काही पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरची जोरदार चर्चा होतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी करण्यात आली आहे. अनधिकृत पब आणि बारवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा’ असा मजकूर असणारे पोस्टर ठाण्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर पुणे नंतर ठाणे आणि मीरा भाईंदर शहरात अनधिकृत हुक्का पार्लर, पब आणि बारवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर ठाणे शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘ड्रग माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा’ असं या पोस्टरवर म्हणण्यात आलं आहे. जनता आपल्या सोबत अशीच कारवाई करत राहा, अशा आशयाचे बॅनर ठाण्यात लावण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्यातील हे पोस्टर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belgaum Black Day : बेळगावात काळा दिवस; महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कर्नाटक सरकारविरोधात निषेध, शिवसेना नेत्यांना प्रवेशबंदी

एकनाथ शिंदेंचा ZP मध्ये पवारांना धक्का, २ दिग्गजांसह सरपंचाने साथ सोडली, शिवसेनेत केला प्रवेश

Prajakta Mali Diet Plan: अभिनेत्री प्राजक्ता माळीसारखं फिट राहचय? आजपासून बदल्या या 4 सोप्या सवयी

Ratnagiri Tourism : ट्रेकिंगसाठी साधं-सोप लोकेशन शोधताय? रत्नागिरीत आहे बेस्ट ठिकाण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे लोकलने चर्चगेटला रवाना

SCROLL FOR NEXT