Buldhana Health  saam tv
Video

Buldhana News:आधी केस गळती नंतर नखांचा त्रास, आता थकवा अन् चिडचिड; बुलढाण्यात नेमकं चाललंय काय? VIDEO

Buldhana Health Crisis Deepens: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ,नांदुरा, खामगाव या तालुक्यात गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांना अचानक केस गळतीचा त्रास सुरू झाला होता व अनेकांना टक्कल पडले होते.

Omkar Sonawane

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ,नांदुरा, खामगाव या तालुक्यात गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांना अचानक केस गळतीचा त्रास सुरू झाला होता व अनेकांना टक्कल पडलं होतं. त्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर याच रुग्णांचे नख विदृप होऊन नख गळण्याचे प्रमाणही वाढले होते. आता याच रुग्णांना थकवा जाणवत आहे आणि त्यांच्यामध्ये चिडचिडपणाही वाढला आहे. ज्या केस गळती व नख गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांच्या नमुना सेलेनियमचे प्रमाण वाढलं होतं अशाच रुग्णांना आता चिडचिडपणा व थकवा येणे अशा तक्रारी समोर आल्याने परिसरात नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे.

केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर देशाच्या सर्वोच्च संशोधन संस्थेच्या पथकाने अर्थात आयसीएमआरच्या पथकाने या भागाचा दौरा करून अनेक नमुनेही तपासणीसाठी घेतले होते. मात्र चार महिने उलटूनही अद्याप या पथकाने अहवाल सादर केला नाही त्यानंतर नख गळती सुरू झाली व नख गळती नंतरही केंद्राच्या विशेष पथकाने या परिसराचा दौरा केला. मात्र काही दिवसातच या नागरिकांना आता थकवा व चिडखोरपणा जास्त प्रमाणात जाणवू लागल्याने प्रशासनाने या परिसरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT