Villagers stunned as buffalo climbs onto rooftop in Singrauli; rescued after hours with crane help. Saam Tv
Video

Singrauli News: म्हैस चक्क घराच्या छतावर चढली|VIDEO

Buffalo Climbs Rooftop in Madhya Pradesh Village: मध्यप्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यात एक म्हैस चक्क १२ फूट उंच छतावर चढली. पावसामुळे चिखल टाळण्यासाठी म्हैस पायर्‍या चढली आणि गावकऱ्यांना आश्चर्यचकित केलं.

Omkar Sonawane

मध्यप्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यातील एक अनोखी आणि गंमतीशीर घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. दादर गावामध्ये एका म्हशीने चक्क १२ फूट उंचीच्या घराच्या छतावर चढून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. या दृश्याने गावकऱ्यांची खदखदून हसत होते, पण त्याचवेळी म्हशीला खाली कसं उतरवायचं, याचीही चिंता सतावू लागली.

ही घटना दादर ग्रामाची असून, सकाळी मुसळधार पावसामुळे म्हैस राहते त्या जागी चिखल व पाणी साचले होते. म्हशीची दोरी सुटल्यामुळे ती चिखलापासून वाचण्यासाठी इकडेतिकडे फिरू लागली. फिरता फिरता ती राम सूरत यादव यांच्या घराजवळ पोहोचली आणि थेट पायर्‍या चढून छतावर जाऊन पोहोचली.

गावकऱ्यांनी हे दृश्य पाहताच गर्दी केली. सर्वांनी खूप वेळ प्रयत्न करून म्हशीला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. अखेर क्रेन मागवण्यात आली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर म्हशीला सुरक्षित खाली उतरवण्यात आलं.

ही घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून लोक म्हशीच्या या भन्नाट कारनाम्यावर हसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळात शिवसेना ठाकरे गटांचा पदाधिकारी मेळावा

Language Controversy : छडी लागे छम छम, मराठी येई घमघम; शंकाराचार्यंसह सगळ्यांना मराठीची मोहिनी

Sunday Horoscope : दवाखाने मागे लागतील, विनाकारण पैसे खर्च होतील; ५ राशींच्या लोकांची चिंता वाढणार

Budh Uday: ऑगस्ट महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; बुध ग्रह उदित होऊन मिळवून देणार पैसे

Shravan : श्रावणात साप दिसल्यास काय होते? जाणून घ्या त्यामागची धारणा

SCROLL FOR NEXT